MTV marathiperpar, संगिता पवार प्रतिनिधी [ GPF ] : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढे देणेसंदर्भात राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या दिनांक 04.12.1980 नुसार 199 पदांना मंजुरी देण्यात आली होती . त्यानंतर काही जादा पदे वगळून एकंदरीत 283 पदांना शासन निर्णय दिनांक 22.08.1983 नुसार मंजुरी देण्यात आली , त्यानंतर पुन्हा शासन निर्णय दिनांक 30.06.2003 नुसार मा.मुख्य सचिव समितीने दिलेल्या सहमतीनुसार , जिल्हा परिषदांच्या भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी सुधारित आकृतीबंधानुसार एकुण 286 पदांना जिल्हानिहाय मंजुरी देण्यात आली .
सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या प्रपत्राकातील नमुद कनिष्ठ सहाय्यकांच्या 43 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2023 ते दिनांक 28.02.2024 पर्यंतच्या कालावधीसाठी या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे .
तसेच या पदांच्या वेतन व भत्ते यासाठी खर्च 2053 – जिल्हा प्रशासन 093/ जिल्हा आस्थापना ( 05 ) स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , 1961 चे कलम 183 नुसार अनुदाने ( आस्थापना अनुदाने ) जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याच्या परिक्षणाकरीता कर्मचारी वर्ग या लेखाशीर्षखाली खर्च टाकण्यात येवून चालु वर्षांसाठी उपलब्ध झालेल्या तरतुदीतुन भागविण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून दिनांक 25.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !