अरे व्वा ! महिलांना पुरुषांपेक्षा स्वस्तात मिळते होम लोन; पहा ए टू झेड माहिती;

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार [Cheap Home Loan ] : मागील काही वर्षांपासून देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये विविध बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. तसेच यापैकी एक विशेष भाग म्हणजे देशाच्या प्रगतीचा भाग बनलेला महिला त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा आता वाढ झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा मोठा बदल झाल्याचा आपल्याला दिसून आला आहे. यामुळेच मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता खरेदी करणाऱ्या महिलांच्या सत्तेमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. रियल इस्टेट ट्रेंड च्या माध्यमातून हे बदल आपल्याला बँक बाजार माध्यमातून ठळक करण्यात आले आहेत. त्यानुसार आता पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त घर असल्याची माहिती समोर आली.

महिलांकरिता कर्ज म्हणजेच होम लोन संबंधित या ठिकाणी प्राथमिक किंवा सह अर्जदार म्हणून विविध फायदे मिळवून दिले जात आहेत (Cheap Home Loan interest rate). चला तर मग याविषयी जाणून घेऊया की महिलांना होम लोन मध्ये कोणकोणते फायदे मिळवून दिले जातात.

महिलांसाठी अगदी कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज, तसेच महिलांना घराचे मालक होण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी विविध बँका तसेच एन बी एफ सी अशी परवडणाऱ्या व्याजदरावर लोन देत आहेत. महिला कर्जदारांना या ठिकाणी दिले जाणारे जे काही व्याजदर असेल ते सामान्यपणे नियमित कर्जदारांपेक्षा कमीत कमी 0.05% पासून 0.1% इतके कमी असते (mahila home loan yojana). या ठिकाणी ऑफर केलेल्या सर्वोत्तम दर हे विशिष्ट अशा विविध बँकेच्या क्रमाने बदलू शकतात यामध्ये सामान्य भाग म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोर वर या गोष्टी आधारित आहेत.

हे पण वाचा : या बँकेच्या खातेधारकांसाठी खुशखबर! FD च्या गुंतवणुकीवर मिळत आहे जास्तीचा परतावा; पहा संपूर्ण माहिती;

खास महिलांसाठी घेतलेल्या होम लोन वर अगदी कमीत कमी व्याजदर कोणत्या बँका आकारतात याविषयी जाणून घेऊया.

1) युनियन बँक

  • नियमित व्याजदर – 9.20-9.55
  • महिला अर्जदार – 9.15-9.50

2) बँक ऑफ इंडिया

  • नियमित व्याज दर – 10.60-10.75
  • महिला अर्जदार – 10.55-10.70

3) सेंट्रल बँक

  • नियमित व्याज दर – 8.50-9.50
  • महिला अर्जदार – ८.३५-९.२५

4) कॅनरा बँक

  • नियमित व्याज दर – 8.60-11.25
  • महिला अर्जदार – 8.55-11.20

आपल्या देशामध्ये विविध मालमत्तेच्या विक्रीवर तसेच खरेदीवर जो काही मुद्रांक शुल्क आकारला जातो याला सहसा आपल्या ठिकाणी टक्केवारीच्या स्वरूपामध्ये मोजतात. जो मालमत्तेच्या किमतीच्या एकूण तीन टक्क्यांपासून नऊ टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतात (Home Loan). परंतु हे शुल्क भारत देशातील विविध राज्यानुसार बदलू शकतात. तसेच राज्यांमध्ये घरे खरेदी करणाऱ्या विविध महिलांकरिता सुद्धा मुद्रांक शुल्क आकारले जाते.

हे पण वाचा : 10 लाख घरांची स्थापना मोदी घरकुल योजनेतून होणार! हे नागरिक असतील पात्र; त्वरित अर्ज करा;

उदाहरणार्थ या ठिकाणी मुद्रांक शुल्क महाराष्ट्र राज्य मध्ये पुरुषांसाठी सहा टक्के आकारला जातो. तर अशावेळी महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी पाच टक्के आकारला जातो पंजाबचा विचार केला तर पुरुषांसाठी सात टक्के तर महिलांसाठी फक्त पाच टक्के इतका कमी मुद्राक शुल्क आकारला जातो (Affordable interest rates Loan). तसेच हरियाणा, ओडीसा, उत्तराखंड, राजस्थान, अशा इतर राज्यांमध्ये सुद्धा महिलांकडून अशा प्रकारे कमी मुद्रांक शुल्क आकारतात.

व्याजदर तसेच अनुदान; आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त महिला ह्या घरमालक व्हाव्यात, यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता भारत सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये व्याज अनुदानाचा सुद्धा समावेश होत आहे. या विविध योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. यामध्ये सुद्धा महिलांकरिता घरांचा मालक किंवा सहमालक असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन लाख साठ हजार रुपये इतके व्याज अनुदानाच्या माध्यमातून दिले जाईल. याशिवाय या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नागरिकांकरिता तसेच कमी उत्पन्न गटांमधील नागरिकांकरिता किंवा या ठिकाणी विधवा महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी सहा लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या कर्जावर सहा ते सात टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे.

Leave a Comment