MTV marathipepar , बालाजी पवार [ Employee Payment ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेसंदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील खाजगी अनुदानित व अंशत : अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन हे सीएमपी ( CMP ) प्रणालीद्वारे करणेबाबत , राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , तसेच राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कोषागार तसेच अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या प्रति हे सविस्तर शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
दिनांक 14.09.2023 च्या शासन पत्रानुसार राज्यातील फास्ट सीएमपी कार्यान्वित असलेल्या 9 जिल्हांमधील यांमध्ये रायगड , पुणे , धुळे , नंदुरबार , कोल्हापुर , सातारा , सिंधुदुर्ग , वाशिम व वर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खाजगी अनुदानित व अंशत : अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापुर विभागील महानगरपालिका / नगरपालिका / कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर यांचे माहे सप्टेंबर 2023 चे वेतन सीएमपी ( CMP ) प्रणालीमार्फत करण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकान्वये देण्यात आलेली आहे .
सदर टप्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची यादी सदर नमुद शासन पत्रपासोबत जोडून देण्यात आलेले आहे . सदर पत्रानुसार वरीलप्रमाणे नमुद अधिकाऱ्यांना केलेल्या कार्यवाहीबाबत संचालनालयास अवगत करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत .
या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दि.22.09.2023 रोजी निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !