गडकरी यांची मोठी घोषणा ! असे केल्यास पेट्रोल होईल फक्त 15 रुपये लिटर; पहा सविस्तर !

Spread the love

MTV marathipepar , संगीता पवार [Flex Fuel Vehicles] : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडे एका विशेष गाडीचे उद्घाटन केले आहे. ती गाडी अगदी कमी किमतीच्या इंधनामध्ये धावू शकते. या इंधनाचे असे काही वैशिष्ट्य आहे जे तयार होताना कमी किमतीमध्ये तयार होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशांमध्ये पहिली इथेनांवर चालणारी ब्रँडेड कार लॉन्च केली आहे. पूर्णपणे इथेनॉलवर ही कार धाऊ शकते. टोयोटा इनोव्हा चे फ्लेक्स फुल मॉडेल या ठिकाणी गडकरी लाँच करणार आहे..

इथेनॉलचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे इंधन तेल पासून तयार होत नाही. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विकणाऱ्या उसापासून याची निर्मिती होते. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या गाड्यांपेक्षा सुद्धा कमी प्रदूषण या ठिकाणी होत आहे (Flex Fuel Vehicles advantages). केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा सुद्धा दावा केला होता की, इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण भविष्यामध्ये वाढली तर देशामध्ये पेट्रोलचे दर पंधरा रुपये लिटर पेक्षाही खाली येतील..

भारत सरकारची योजना काय ? भारत सरकार सुद्धा सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के पर्यंत इथेनॉल मिसळण्याचा प्रयत्न करत आहे. E20 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनेच्या माध्यमातून 2025-26 पर्यंत देशभरामध्ये 20 टक्के इतके इथेनॉल मिश्रित पेट्रोल लॉन्च केले जाईल (Flex Fuel engine). भारत सरकारच्या माध्यमातून 2021 – 22 च्या पुढच्या संदर्भातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता 86 टक्के इतके इंधन आयात केले होते. अकरा जुलै 2023 मध्ये पेट्रोलियम मंत्री माननीय श्री हरदीप सिंह पुरी यांनी सुद्धा इथेनॉल मिश्रित पेट्रोल सध्या पेट्रोल पंपावर मिळणार आहे आणि 2025 पर्यंत संपूर्ण देशभरात असे पेट्रोल उपलब्ध होईल याची माहिती दिली..

हे पण वाचा : राज्यातील या तरुणांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये! पात्र तरुणांची यादी पहा व अर्ज करा !

इथेनॉल नेमकं असते कसे ? : इथेनॉल हे एक प्रकारचे वेगळे अल्कोहोलच आहे. इथेनॉल हा उसापासून तयार होणारा एक बाय प्रॉडक्ट आहे. इथेनॉल ची निर्मिती उसाच्या रसापासून, तसेच बटाटा, मका, कंदमुळे, खराब झाली की त्यापासून बनवले जाते. स्टार्च तसेच साखर याचे विघटन तयार होते आणि इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. याचा फ्लेक्स फ्युल म्हणून वापर होतो (ethanol fuel). इथेनॉल मिसळून तयार झालेले फ्लेक्स फ्युल पेट्रोल पंपावर पाठवले जाते. फ्लेक्स फ्युलच्या माध्यमातून चालणारी सर्व वाहने ही वेगळी असतात. वाहनाचे इंजिन अशा पद्धतीने तयार केले असते की त्यामध्ये फ्लेक्स फुल वापरल्यास कोणतीही अडचण निर्माण होत नाही.

हे पण वाचा : सिलेंडर पासून झाली सुटका ! आजच घरी आना ही सोलर शेगडी; सरकार देत आहे अनुदान; त्वरित अर्ज करा व लाभ घ्या;

सर्वाधिक इथेनॉल वापरणार देश कोणता? : जगभराचा विचार केला तर ब्राझील सर्वात जास्त फ्लेक्स फ्युलचे उत्पादन घेतो. 1975 यावर्षीक कालखंडामध्ये ते उत्पादनाविषयी स्वतःला आत्मनिर्भर बनवण्याकरिता इथेनॉलचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली (Ethanol vs petrol). आज बघितले तर ब्राझील मधील एकूण 93% इतक्या गाड्या इथेनॉल मिश्रित फ्लेक्स फ्लुअलवर चालत आहेत. 2030 पर्यंतच ब्राझील ने आपल्या इंधनाच्या मागणी पैकी एकूण 72 टक्के इतका वाटा जैविक इंधन मधून पूर्ण करण्याचा विचार आहे..

इंधनाचे दर होतील कमी; फ्लेक्स फ्लुअलवर चालणाऱ्या सर्व गाड्या पेट्रोल, डिझेल, तसेच इथेनॉल पैकी कशावर ही चालू शकतात. नितीन गडकरी यांनी आज जी कार देशामध्ये लॉच केली आहे ती 100% इथेनॉलवर चालते. म्हणजेच आता फ्लिक्स फ्लुअलवर सोबत इथेनॉल मिक्स करून सुद्धा तुम्ही गाडी चालू शकता. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या आपण वाढवली तर प्रदेशामधून जे कच्चे तेल आयात होते त्याचे प्रमाण आपल्याला कमी करता येते. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन आपल्याला वाचवता येते. यासोबतच इंधनाचे दर सुद्धा कमी होतील. काही महिन्यापूर्वी बघितले तर गडकरी यांनी असे म्हटले की इथेनॉल मिश्रित इंधन वापरल्यास पेट्रोलचे दर पंधरा रुपयांवर येतील.

शेतकऱ्यांनाही होणार फायदा; Flex Fuel Vehicles : याचे नाव किंमत ही पेट्रोलियम पदार्थांपेक्षा कित्येक पटीने कमी आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये 20 टक्के इतके इथेनॉल मिसळले तर नक्कीच पेट्रोलच्या किमती कमी होऊ शकतात. इथेनॉल वरती पेट्रोल पेक्षाही कमी कर आकारतात. या कारणास्तव इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोल पेक्षा स्वस्त आहे. हे इंधन शेती उत्पादनांवर आधारित असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होईल असे सांगितले आहे.

Leave a Comment