DA Hike Salary Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाने आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चांगलीच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये एकूण तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून, DA वाढीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कितपत वाढ होईल याविषयी तपशीलवार माहिती घेऊया..
प्रशासनाने शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिकांसाठी गुड न्यूज दिलेली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव महागाई भत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या वेळी महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याचे अपेक्षा सर्वच वर्तवत आहेत (DA Hike news). सध्याचा महागाई भत्ता बघितला तर 42% इतका शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असून, त्यामध्ये आणखी तीन टक्के वाढतील. म्हणजेच महागाई भत्ता हा 45% इतका होईल.
प्रशासन प्रत्येक वेळी आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये सोबतच पेन्शन धारकांच्या महागाईमध्ये सवलत प्रत्येक वर्षा मधून दोन वेळा जानेवारी महिन्यामध्ये तसेच जुलै महिन्यामध्ये सुधारणा केली जाते (DA Hike central govt). आधी जानेवारी मधील महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली होती.
महागाई भत्त्याची मोजणी कशी होते; केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची आकडेवारी ही औद्योगिक कामगारांकरिता ग्राहक किंमत निर्देशांच्या माध्यमातून निश्चित केली जाते. यासाठी फक्त निश्चित सूत्र विचारात घेतली जातात. मागील बारा महिन्यांमधील सरासरी सी पी आय आय डब्ल्यू 382 इतका आहे. तर या सूत्रानुसार महागाई भत्ता हा 46% इतका असणार अशी शक्यता दिसत आहे (DA news latest today). तर मागील वेळी 42% नुसार एक जुलै मध्ये आता महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढेल प्रशासन या माध्यमातून महागाई भत्ता मध्ये दशांश पेक्षा जास्त वाढ करण्याचा अजिबात विचार करत नाही. अशा परिस्थितीमध्ये तीन टक्क्यांच्या वाढीसह महागाई भत्ता 45 टक्क्यांवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी 28 सप्टेंबर रोजी महागाई भत्ता जाहीर केला होता..
कर्मचाऱ्यांच्या पगारात कितपत वाढ होईल; ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे मुख्य सचिव श्री शिव गोपाल मिश्रा यांनी अशी माहिती दिली की, महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आम्ही सुद्धा डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्याची तत्परतेने मागणी करत आहेत आणि प्रशासनाने मान्य केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 46% इतकी वाढ होईल. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन प्रत्येक महिन्याला 36 हजार रुपये इतके असेल. तर त्याचा जो काही महागाई भत्ता असेल तो 15 हजार रुपये इतका असेल (DA latest News Today 2023 central government employees). या माध्यमातून जुलै 2023 पासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ केल्यानंतर यामध्ये एक हजार रुपयांची वाढ होईल. म्हणजे महागाई भत्ता 16 हजार रुपयांवर पोहोचेल.
हे पण वाचा : ग्राहकांनो थोडी घाई करा ! सोने – चांदीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचा दर;
महागाई भत्त्याची थकबाकी मिळेल की नाही; कोरोना कालखंडात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 या एकूण 18 महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणताही महागाई भत्ता जाहीर केला नव्हता. या माध्यमातून पेन्शन धारकांना सुद्धा सवलती दिल्या होत्या. संसर्गाच्या कालावधीमध्ये सरकारवर चांगलाच आर्थिक भर लादला होता. तो भर कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. या निर्णयामुळे प्रशासनाने तब्बल 34,402 कोटी रुपयांची बचत केली असून, गेल्या वर्षी पासूनच शासकीय कर्मचारी हे थकित असणाऱ्या महागाई भत्त्याच्या मागणीची तातडीने दोरी धरत आहेत. तरीही कोणतीही तक बाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही असे स्पष्टपणे सरकारने जाहीर केले आहे.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !