10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या NPS धारकांना मिळणार आता,अशा प्रकारचे आर्थिक लाभ ! पाहा सविस्तर शासन निर्णय!

Spread the love

MTV marathipepar संगिता पवार ,प्रतिनिधी  [ NPS Employee GR ] : NPS धारक असणारा कर्मचारी हा 10 वर्षे सेवा होण्यापुर्वीच सेवेत असताना मृत्यु पावल्यास , नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशिर वारसास द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत राज्य शासनांकडून निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

वित्त विभागाच्या दिनांक 29.09.2018 रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील NPS योजनेचे सदस्य असाारे कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षे पुर्ण होण्यासपुर्वीच सेवेत असताना , मृत्यु पावल्यास सदर कर्मचाऱ्याच्या वारसास / नामनिर्देशित व्यक्तीस रुपये 10 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्याच्या NPS खाती जमा असलेली संचित रक्कम देण्याची तरतुद वित्त विभागाच्या दिनांक 28.02.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तरतुद करण्यात आलेली आहे .

सदर सानुग्रह अनुदान मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास देणेबाबत नविन लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्यास  कृषी व पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागांकडून दिनांक 10.02.2023 मान्यता देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेशन योजना लागु करणेबाबत दि.20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली महत्वपुर्ण सुनावणी !

वरील नमुद सर्व शासन निर्णयानुसार , राज्यातील NPS योजनेचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यु पावल्यास सदर कर्मचाऱ्यांच्या वाससांना / नामनिर्देशन व्यक्तीस रुपये 10 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान प्राप्त होईल .

परंतु आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.31 मार्च 2023 रोजी निर्गमित GR नुसार , कुटुंबनिवृत्ती वेतन  व रुग्णता निवृत्तीवेतन योजना पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या धर्तीवर लागु करण्यात आली असल्याने , सदर सानुग्रह अनुदान व NPS खाती जमा असणारी रक्कम प्राप्त होण्याऐवजी NPS धारक कर्मचाऱ्यांच्या वारसास कुटुंबनिवृत्तीवेतन योजना लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment