MTV marathipepar , संगिता पवार [ Teacher Pramotion ] : शिक्षकांना पदोन्नती देणेबाबत राज्याच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 12 सप्टैंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक राज्याचे उप सचिव यांच्या कडून निर्गमित करण्यात आला आहे .
केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दिनांक 10 जून 2014 मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) याबाबत संदिग्धता निमार्ण झालेली आहे .यानुसार शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या शासन निर्णय क्र.डीआरई/1094/704/प्राशि-1 दिनांक 18 जानेवारी 1995 नुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) म्हणजे बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी.एड ही व्यावसायिक अर्हता धारक करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे असा आहे .
त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान अधिसूचना दिनांक 10 जून 2014 मधील आवश्यक पात्रतेमधील प्रशिक्षित प्रशिक्षित शिक्षक ( प्राथमिक ) या पदावर 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे , म्हणजेच बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी.एड ही व्यवसायिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून 3 वर्षांचा अनुभव पुर्ण करणारे शिक्षकच पात्र ठरणार आहेत .
अशा प्रकारचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापुर यांच्या प्रति राज्याचे उप सचिव ( महाराष्ट्र शासन ) यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहेत . सदर केंद्र प्रमुख पदोन्नती संदर्भातील ग्राम विकास विभागांकडून दि.12.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !