अर्जित रजा , अर्धवेतन रजा , परिवर्तीत रजा व मोबादला रजा किती दिवस घेता येतात , तसेच रजेचे नविन नियम जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

अर्जित रजा ( Earned Leave ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 300 दिवस ( यांमध्ये एका वेळेस 180 दिवस ) अशा प्रकारे अर्जित रजा घेता येते , एका कॅलेंडर वर्षांमध्ये जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या खाती 15 दिवस तर ऑगस्ट ते डिसेंबर या सहा महिने कालावधीमध्ये 15 दिवस याप्रमाणे रजा जमा होते . 300 दिवसांपर्यंत रजा जमा करता येतात त्यानंतर जमा करता येत नाहीत .

अर्धवेतन रजा ( Half Pay Leave ) : कर्मचाऱ्यांने पुर्ण केलेल्या प्रति वर्षासाठी 20 दिवस या प्रमाणे अर्धवेतनी रजा मिळते . एका कॅलेंडर वर्षांमध्ये माहे जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी 10 दिवस तर माहे ऑगस्ट ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीकरीता 10 दिवस याप्रमाणे अर्धवेतन रजा जमा होते , परंतु ही रजा कर्मचाऱ्यांच्या निलंबन काळामध्ये धरता येत नाही .

परिवर्तीत रजा ( Commuted Leave ) :  परिवर्तीत रजा ही कर्मचाऱ्यास देय असणाऱ्या अर्धवेतन रजेच्या निम्मे दिवस अनुज्ञेय करण्यात येत असते . म्हणजेच अर्धपगारी रजा दुप्पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळत असते ,या रजेची कमाल 90 दिवस याप्रमाणे मिळते .

हे पण वाचा : गणरायाने आणली मोठी गुड न्युज ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामध्ये इतक्या टक्यांची वाढ !

 अनिर्जित रजा ( Leave Not Due ) :  ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यासच मिळत असते , यांमध्ये जेवढी अर्धवेतन रजा ही अर्जित होवू शकते ति रजा म्हणजे अनर्जित रजा होय .

मोबदला रजा ( सुट्टी ) : मोबदला सुट्टी ही जादा काम केल्याच्या बदल्यात देण्यात येत असते , तर ही रजा फक्त निम्नश्रेणी मधील गट ड संवर्गातील ( Class – 4 ) कर्मचाऱ्यांनाच मिळत असते . सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदल्यात ही सुट्टी घेता येत असते , तर ही सुट्टी एका वर्षांमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस साठवता येत नाही , तर पुढील वर्षासाठी उपयोगात आणता येत नाहीत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment