गणरायाने आणली मोठी गुड न्युज ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामध्ये इतक्या टक्यांची वाढ !

Spread the love

MTV marathipepar , बालाजी पवार प्रतिनिधी [ DA ] : आज दिनांक 19.09.2023 रोजी संपुर्ण देशांमध्ये गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे . हा सण भारतांमध्ये खुप मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो , जसा गणरायाचे आगमन झाले तसे कर्मचाऱ्यांच्या आनंदामध्ये मोठी भर पडली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .

देशातील केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के डी.ए ची वाढ लागु करण्यात आलेली होती , सदर डी.ए हा कामगार मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या AICPI निर्देशांकांच्या आधारे निश्चित करण्यात येत असतो . माहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये या निर्देशांकामध्ये झालेल्या वाढीच्या निर्देशांकानुसार डी.ए मधील वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .

महागाई भत्तामध्ये होणार इतकी वाढ : आज आलेल्या मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 3 टक्क्यांची वाढ केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे . आज आलेल्या मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये 3 टक्क्यांची वाढ करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , या संदर्भातील अधिकृत्त ज्ञान निर्गमित होणे बाकी आहे .

हे पण वाचा : अर्जित रजा , अर्धवेतन रजा , परिवर्तीत रजा व मोबादला रजा किती दिवस घेता येतात , तसेच रजेचे नविन नियम जाणून घ्या सविस्तर !

मागील वर्षांमध्ये माहे सप्टेंबर महिन्यांत जुलैची वार्षिक डी.ए वाढ फरकासह लागु करण्यात आली होती , यावरुन केंद्र सरकारकडून या महिन्यातच डी.ए वाढ करणेबाबत अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित करेल . म्हणजेच माहे सप्टेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे .

सध्याच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता ( DA ) चा लाभ मिळत आहे , आता आणखीण 3 टक्क्यांची वाढ होणार असल्याने पुढील महिन्यांच्या पगारासोबत एकुण 45 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .यामुळे गणरायाच्या आणमणाने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी पडणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment