MTV mararthipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Shala Dattak Yojana ] : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी विविध योजना व उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र सारख्या अधिक लोकसंखेच्या राज्यात सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करावयाची झाल्यास शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यास काही मर्यादा येवू शकतात. केंद्र शासनाच्या शिक्षण व साक्षरता मंत्रालयाने शालेय शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्था तसेच लोकसहभाग यांचे योगदान प्राप्त करून घेण्यासाठी विद्यांजली हा उपक्रम राबविला आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टीकोनातून लोकसहभागाची तसेच खाजगी सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे.
केंद्र शासनाच्या या भूमिकेशी सुसंगत धोरण राज्यात राबवून त्या माध्यमातून राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशुर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस यांच्या सहयोगाने पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करुन त्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या प्रसारासाठी शाळा दत्तक योजना ही नवीन योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील केवळ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ लागू राहील .
२. दत्तक शाळा योजनेची उद्दिष्टे :- i) शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, देखभाल व रंगरंगोटी करण्यासाठीची व्यवस्था विकसित करणे. ii) महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यास मदत करणे. iii) विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढवून त्यायोगे शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करणे. iv) दर्जेदार शिक्षणाच्या सर्वदूर प्रसारासाठी आवश्यक संसाधनाची जुळवणी करणे . v) गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच आरोग्य, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.
योजनेची कार्यपद्धती :- इच्छुक देणगीदार संबंधित शाळेशी संपर्क साधून त्यांच्या गरजा विचारात घेऊन विहित कालावधीत पुरवावयाच्या वस्तु व सेवा यांचे निर्धारण करतील. त्यानंतर या वस्तु व सेवांचे बाजार भावानुसार अंदाजे मूल्य निश्चित करून सदर शाळा दत्तक घेण्यास आपण इच्छुक असल्याचा प्रस्ताव त्या शाळेच्या प्रशासनास सादर करेल. सदर प्रस्तावात शाळा ५ वर्षे किंवा १० वर्षे यापैकी कोणत्या कालावधीसाठी दत्तक घेण्यात येणार आहे याचा स्पष्ट उल्लेख असेल.
सदर योजना अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या वस्तु व सेवांची प्रकारनिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे .
दत्तक शाळा योजना राबविणेबाबतचा शालेय क्रिडा विभागांकडून दिनांक 18.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..