नविन वेतन आयोग , महागाई भत्ता वाढ , वेतनवाढ इ.प्रमुख मागणीकरीता ST कर्मचारी पुन्हा एकदा सणासुदीच्या काळांत संपावर !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : महागाई भत्तामध्ये वाढ करणे तसेच नविन वेतन आयोग लागु करण्यात यावेत अशा प्रमुख मागणीकरीता राज्यातील बस महामंडळ मधील कर्मचारी आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत .

सातवा वेतन आयोग लागु करण्यात यावेत : बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार अत्यल्प वेतनश्रेणींमध्ये वेतन मिळते , शिवाय बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधिन कालावधी हा तीन वर्षांचा असल्याने नियमित वेतनश्रेणी ही तीन वर्षांनंतर मिळते . यामुळे बस महामंडळ मधील कर्मचारी हे अत्पल्प वेतनांमध्ये दिवस – रात्र काम करीत असतात .

यामुळे राज्य सरकारने बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करावा , तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे मुळ वेतन लागु करण्यात यावेत , त्याचबरोबर किमान मुळ वेतन हे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे .

हे पण वाचा : कर्मचारी कृती समितीचा बाह्ययंत्रणेद्वारे पदभरतीचा शासन निर्णय रद्द करणेबाबत , निवेदन ! बाह्यस्त्रोत भरतीमधील पदांस मिळणार इतकेच वेतन !

महागाई भत्ता 42 % : – राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के प्रमाणे डी.ए लाभ मिळतो . राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना डी.ए लाभ लागु करण्याची मागणी करण्यात येत आहे  , नुकतेच राज्य सरकारने बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करण्यात आली आहे , यामुळे बस महामंडळ मधील कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए 38 टक्के झालेला आहे .

सध्या गणेश उत्सव , नवरात्री तसेच दिपावली सण जवळ येत आहेत , याच पार्श्वभुमीवर ST कर्मचारी आपल्या मागणी मान्य न झाल्यास पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा ST कर्मचारी संघटनेने दिला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment