राज्य कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.15.09.2023

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay Commission Farak ] : – राज्यातील कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता तसेच अंशराशीकरण , उपदानाची रक्कम अदा करणेबाबत राज्य शासनांच्या कोषागारातुन तातडीचे परिपत्रक दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .

राज्य शासनांच्या महाराष्ट्र विनियोजन ( लेखानुदान ) अधिनियम 2023 नुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर 2023 च्या ज्ञापनाद्वारे माहे सप्टेंबर 2023 या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष 222020173/36 मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतुद फक्त सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्तासाठी अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच लेखाशिर्ष 22020173/04 मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतुद फक्त सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता , दुसरा हप्ता , तिसरा हप्ता व अशंराशीकरण , उपदानासाठी अदा कराण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत . तसेच सदर नमुद लेखाशिर्ष बाबीमधील रक्कम इतर बाबींकरीता खर्च करु नयेत अशा सुचना सदर परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : महागाई भत्ता 45% बाबत मोठी आनंदाची अपडेट !

त्याचबरोबर सदर ज्ञापनाद्वारे वितरीत केलेल्या तरतुदीपैकी रक्कम शिल्लक राहील्यास संचालनालयास कळविण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर लेखाशिर्ष 22020173/36 ची तरतुद केवळ शालार्थ प्रणाली मधूनच अदा करण्याचे तर लेखाशिर्ष 22020173/04 ची तरतुद आवश्यक असेल तितकीच बीडीएस प्रणालीवरुन खर्च करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .

सदर शासन परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , वेतन / निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने बाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति हे शासन परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .सदर कोषागारातुन दि.15.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment