MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ school closure dated 6 th August ] : राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने पुढाकार घेवून संस्थाचालक संघटना , तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 28 संघटना एकत्र येवुन दिनांक 06 ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती समोर आली आहे .
राज्यातील विशेष : अनुदानित शाळा ( यांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा ) मधील कार्यरत शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार शिक्षक आमदार विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत आहेत , तरी देखिल सदर प्रश्नांवर राज्य शासनांकडून उदासिनता दिसून येत आहेत . यामुळे सदर कर्मचाऱ्यांकडून दिनांक 06 ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहेत .
शाळा बंद आंदोलनाच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत ? : यांमध्ये आंदोलन कर्ते शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दिनांक 15 मार्च 2024 च्या सेवक संच शासन निर्णयांमध्ये बदल करावी व ज्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी मुख्याध्यापक हे पद मंजूर करण्यात यावेत तसेच दिनांक 01.11.2005 पुर्वी नियुक्त झालेल्या विना अनुदानित , तसेच अंशत : अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु करण्याचा निर्णय तातडीने जाहीर करण्यात यावा ..
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती, लगेच करा आवेदन ..
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळावे , पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन शिक्षकांच्या नियुक्ती तातडीने देण्यात यावेत , किंवा शिक्षकांची नियुक्तीसाठी परवानगी मिळावी . तसेच चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांच्या मानधनावर नेमणूक न करता त्यांना जुन्या आकृतीबंधानुसार कायम वेतनावर नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे .
- तसेच अनुदानाचा टप्पा हा शंभर टक्के जाहीर करण्यात यावा .
- शाळांमध्ये कला , क्रिडा शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी .
- शिक्षक / कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा देण्यात यावी .
- अनुदानाकरीता पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालय यांना अनुदान जाहीर करण्यात यावेत .
- पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावेत .
अशा विविध मागणीसाठी दिनांक 06 ऑगस्ट या दिवशी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व इतर शिक्षक / कर्मचारी संघटना मार्फत घेण्यात आला आहे .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024