MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update upto date 05 aug ] : दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अति जोराचा पाऊस पडणार असल्याचे तर 05 ऑगस्ट नंतर राज्यात कडक ऊन पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे .
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अति जोराचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर दिनांक 05 ऑगस्ट नंतर राज्यातील काही भागांमध्ये कडक ऊन पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सांगली , सातारा , कोल्हापुर या जिल्हासहित पश्चिम महाराष्ट्रांमध्ये पावसाचा जोर आता अधिकच वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .या भागांमध्ये मागील काही दिवसांपासुन अति मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली असून , अनेक ठिकणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे .तर या भागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त करण्यात आला आहे .
या भागात जिल्ह्यात पडणार जोराचा पाऊस : राज्यात आता रिमझिम स्वरुपाचा पाऊस कमी होणार असून , अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . दिनांक 05 ऑगस्ट पर्यंत राज्यात विदर्भ , उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा भागांमध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे . तर राज्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर , नागपुर ,वर्धा , अमरावती , वाशिम ,बुलढाणा ( सिंदखेड राज परिसर ) , जळगाव , नाशिक , मालेगाव , नंदुरबार , धुळे या जिल्ह्यांमध्ये दिनांक 05 ऑगस्ट पर्यंत जोराचा पाऊस पडणार असल्यचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे .
कडक ऊन : ऑगस्ट महीन्यात 05 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा कडक स्वरुपाचा ऊन पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . राज्यात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाबरोबरच उन्हाचे चटके देखिल चांगले जाणवतात .. परंतु यंदा पावसाने उशिरा एन्टी केल्याने , सर्व ऋतुचे ताळमेळ बिघडले आहेत .
ऑगस्ट महिन्यात 05 ऑगस्ट नंतर 6 ते 7 ऑगस्ट कालावधीत राज्यात कडक ऊन पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर दि.08 ऑगस्टपासुन राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024