MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new update from lokasabha ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट लोकसभेतुन येत आहेत . सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागास निवेदने सादर करण्यात आलेले आहेत .
श्री.आनंद भदौरिया यांनी आठवा वेतन आयोग बाबत दिनांक 22 जुलै रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता . श्री. आनंद भगौरिया हे समाजवादी पक्षाचे धौहरा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे खासदार आहेत . त्यांनी अर्थमंत्र्यांच्या प्रति सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत 03 प्रश्न विचारण्यात आले होते , त्या प्रश्नाकरीता अर्थमंत्र्यांनी मोजक्या शब्दांमध्ये लेखी उत्तर दिले आहेत .
श्री.आनंद भदौरिया ( खासदार – धौहरा मतदारसंघ ) यांच्याकडून विचारण्यात आलेले प्रश्न 1) जुन , 2024 या महिन्यांत 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत , सरकारला विविध क्षेत्रांकडून निवेदन प्राप्त झाले आहे का ? 2 ) आणि असल्यास , त्याचा तपशिल आणि त्यावर केलेली कार्यवाही , प्रतिनिधीत्वानुसार ;
3) देशातील अभूतपुर्व महागाई लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकार आठवा वेतन केंद्रीय वेतन आयोग कोणत्या वेळेपर्यंत स्थापन करेल ? असे तीन प्रश्न ( अतारांकित प्रश्न क्र.195 ) श्री.आनंद भदौरिया यांनी विचारले होते .
सदर प्रश्नाला वित्त विभागाचे राज्यमंत्री श्री.पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सर्व प्रश्नासाठी एकच उत्तर दिले आहे . उत्तर देताना नमुद करण्यात आले आहे कि , जुन 2024 मध्ये आठवा व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 02 निवेदने प्राप्त झाली आहेत . सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही . असे उत्तर देण्यात आले आहेत .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024