MTV , marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PUBLIC HOLIDAY 2023 ] : सन 2023 मधील सार्वजनिक सुट्टींची यादी राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .ही सुट्टींची यादी राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच राज्यातील सरकारी / खाजगी शाळा , महाविद्यालये यांच्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहेत , सदर सन 2023 मधील सार्वजनिक सुट्टींची यादी सविस्तर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
माहे सप्टेंबर महिन्यातील सार्वजनिक सुट्टींची यादी : माहे सप्टेंबर महिन्यांमध्ये दि.19 सप्टेंबर ला गणेश चतुर्थी निमित्त , ईद – ए मिलाद निमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी अशा दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी आहे .
माहे ऑक्टोंबर महिन्यातील सार्वजनिक सुट्टींची यादी : माहे ऑक्टोंबर महिन्यांत महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक 02 ऑक्टोंबर वार सोमवार या दिवशी , तसेच दसरा निमित्त दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 वार मंगळवार या दोन दिवसांसाठी सार्वजनिक सुट्टी आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर वेतनाबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट !
माहे नाव्हेंबर महिन्यांतील सार्वजनिक सुट्टींची यादी : माहे नोव्हेंबर महिन्यात दिनांक 12 नोव्हेंबर वार रविवार रोजी दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन ) रोजी , तर दिनांक 14 नोव्हंबर वार मंगळवार रोजी दिवाळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे .तर दिनांक 27 नोव्हेंबर वार सोमवार रोजी गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे .
तर माहे डिसेंबर महिन्यांत ख्रिसमस या सणानिमित्त दिनांक 25 डिसेंबर , वार सोमवार ह्या दिवशी डिसेंबर महिन्यातील एकमेव सार्वजनिक सुट्टी आहे .सण / उत्सव व दिनांकांसह माहे सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यातील सार्वजनिक सुट्यांची यादी पुढील चार्टप्रमाणे पाहु शकता ..
सण उत्सव | दिनांक | वार |
गणेश चतुर्थी | 19 सप्टेंबर | मंगळवार |
ई-ए मिलाद | 28 सप्टेंबर | गुरुवार |
महात्मा गांधी जयंती | 02 ऑक्टोंबर | सोमवार |
दसरा | 24 ऑक्टोंबर | मंगळवार |
दिवाळी अमावस्या | 12 नोव्हेंबर | रविवार |
दिवाळी ( बलिप्रतिपदा ) | 14 नोव्हेंबर | मंगळवार |
गुरुनानक जयंती | 27 नोव्हेंबर | सोमवार |
ख्रिसमस | 25 डिसेंबर | सोमवार |